Ad will apear here
Next
रुद्राक्षांपासून बनवले बाप्पाचे मंदिर
नेपाळहून मागवले दहा हजार रुद्राक्ष

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड परिसरातील प्राधिकरण भागात राहणारे सागर घिगे यांनी रुद्राक्षांपासून साकारण्यात आलेल्या मंदिरात गणरायाची स्थापना केली आहे. या मंदिराचा हा देखावा पूर्णपणे इको-फ्रेंडली असल्याचे सागर यांनी सांगितले आहे.  

हा घरगुती इको फ्रेंडली गणपती देखावा तयार करण्यासाठी सागर घिगे यांनी २५ दिवस परिश्रम घेतले आहेत. विशेष बाब म्हणजे या मंदिरासाठी वापरण्यात आलेले हे रुद्राक्ष नेपाळहून मागवण्यात आले असून त्यासाठी तब्बल ४५ हजार रुपये खर्च केला असल्याचेही सागर यांनी सांगितले आहे. परिसरातील गणेशभक्तांसाठी हा रुद्राक्षांचा देखावा असलेला गणपती सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. ते मंदिर पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. 

(रुद्राक्षांपासून बनवलेल्या मंदिराचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZNDBS
Similar Posts
‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ आरत्यांमध्ये हमखास चुकीच्या म्हटल्या जाणाऱ्या शब्दांवर कोटी करणारे संदेश हल्ली सोशल मीडियावर फिरत असलेले दिसतात. अशाच काही संदेशांवरूनच पुण्यातील सायली दामले यांना एक भन्नाट कल्पना सुचली. प्रबोधनाचा उद्देश ठेवून त्यांनी या चुकीच्या शब्दांना गंमतशीर चित्रांमध्ये उतरवलं. ‘उच्चारण’ या नावाने सुरू केलेली
अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृतींना आळा पुणे : काळ कितीही पुढे गेला असला तरी समाजातील अंधश्रद्धा पूर्णपणे संपत नाहीयेत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी पोलीस व ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांच्या साह्याने खडकीमधील अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृतींना नुकताच आळा घातला आहे
‘मस्ती की पाठशाला’ शिबिराची सांगता पिंपरी चिंचवड : प्रवीण निकाळजे यांनी आयोजित केलेल्या ‘मस्ती की पाठशाला’ या उन्हाळी प्रशिक्षण शिबीराची नुकतीच सांगता करण्यात आली. शिबिराचा सांगता समारंभ व बक्षिस वितरण नुकतेच पार पडले. यावेळी सहभागी मुलांनी नृत्य आणि वक्तृत्व कलेचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमास नगरसेवक हर्षल ढोरे, माई ढोरे, शारदा सोनावणे, संतोष कांबळे, उपस्थित होते
देश-विदेशांतील गणेशमूर्तींच्या दर्शनाची संधी पुणे : सर्वांचा लाडका गणपतीबाप्पा केवळ आपल्या देशातच नव्हे, तर अन्य वेगवेगळ्या देशांतही वेगवेगळ्या रूपांत पाहायला मिळतो. देशविदेशातील त्याची नाना रूपे बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात भरलेल्या प्रदर्शनात पुणेकरांना सध्या पाहायला मिळत आहेत. भारतीय संस्कृतीचे अभ्यासक देवदत्त अनगळ यांच्या संग्रहात असलेल्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language